निर्भीड पत्रकार : रोहित जाधव
शिरोळ तालुका आणि परिसरातील शेतकरी उन्नत व्हावा हा ध्यास घेऊन स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हे आपल्या आयुष्याची सात दशकाहूनया अधिक काळ या परिसरात कार्यरत राहिले. त्यांनी सहकार-कृषी औद्योगिक समाजरचनेद्वारे व समाजवादी मुल्य अंगीकारुन या परिसरात अनेक सहकारी संस्थांची उभारणी करुन त्या चांगल्या पद्धतीने व कार्यक्षमतेने चालवल्याही. याचबरोबर त्यांनी शिरोळ तालुक्याचे विधानसमेत १५ वर्षे प्रतिनिधीत्वही केले. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासला जावा व पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या हेतुने त्यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य, उद्योग व क्रिडा या क्षेत्रात लोककल्याणाच्या समर्पित भावनेने कार्यरत असणा-या तीन महानीय व्यक्तीना गौरविले जाते. सन २०१५ पासून त्यांच्या स्मृती दिनानिमित्त सदर पुरस्कारांचे रागारंभपूर्वक वितरण केले जात आहे. यावर्षी निवड समितीच्या तीन बैठका पार पडल्या. यामध्ये देश व राज्यपातळीवर वर नमुद अरालेल्या क्षेत्रात मान्यवरांच्या नादांवर चर्चा होऊन निवड समितीने यावर्षी खालील तीन व्यक्तींना पुररकार देण्याचे निश्चित केले आहे
1. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.समाजभुषण पुरस्कार डॉ. अरुणा रॉय पाटील यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रु. १ लाख रुपये

2. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार श्री. विद्याधर अनारकर मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रु. ५० हजार रुपये

3. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील युवाप्रेरणा पुरस्कार कु. पूजा दानोळे आतरराष्ट्रीय सायकलपटू,मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रु.२५ हजार रुपये

सदरच्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींना डॉ. गणेश देवी प्रख्यात साहित्यीक यांच्या हस्ते व डॉ. यशवंतराव थोरात – माजी अध्यक्ष, नाबार्ड यांच्या अध्यक्षतेखाली ११ व्या स्मृती दिनानिमित्त बुधवार दि. ०१ एप्रिल २०२६ रोजी सायं. ५.०० वाजता गौरविले जाणार आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष श्री. विनोद शिरसाट यांनी दिली
या पत्रकार परिषदेस श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख श्री. गणपतराव पाटील, आमदार श्री. अशोकराव माने, कारखान्याचे चेअरमन श्री. रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन श्री. शरदचंद्र पाठक, शिरोळचे उपनगराध्यक्ष श्री. पृथ्वीराज यादव, माजी संपादक श्री. वसंत भोसले, समिती सदस्य श्रीमती सुजाता शिंदे, श्री. महादेव धनवडे, श्री. चंगेजखान पठाण, श्री. सर्जेराव पवार, श्री. आप्पा पाटील, श्री. चंद्रकांत जाधव-घुणकेकर, श्री. आप्पासाहेब लड्डे, श्री. गंडाप्पा पवार, श्री. विलास कांबळे, सौ. स्वाती सासणे, श्री. अनंत धनवडे, श्री. शेखर पाटील इ. उपस्थित होते.
