कोल्हापूर-सांगली संयुक्त वधू-वर मेळाव्यावरून नाराजी; पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप,
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अखिल भारतीय नाथ संघटनेच्या वतीने नुकताच संयुक्त वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र, हा मेळावा आयोजित करताना संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.माहितीनुसार, दोन्ही जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मेळाव्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. तसेच, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कोणतीही अधिकृत बैठक घेण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून “पदाधिकारी असूनही उपयोग काय?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.संघटनेच्या कामकाजात पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता अपेक्षित असताना, काही जणांकडून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याची टीका होत आहे. अशा पद्धतीने मानाचा कारभार केल्यास संघटनेच्या प्रतिमेला गालबोट लागू शकते, अशीही भावना व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठांकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असून,नाराज होऊन नाथ संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तसेच कोल्हापूर युवा सेना जिल्हा अध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे.
