जयसिंगपूर येथे शिवप्रेमीचा पेढे साखर वाटून तसेच आतिषबाजी करून आनंदत्सव साजरा.

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळां मध्ये सहभाग झाला हा सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी शिवतीर्थ येथे शिवप्रेमिनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांना मानवंदना तसेच जिजाऊ वंदना म्हणून पेढे-साखर वाटून आनंदत्सव साजरा करण्यात आला.
शिवतीर्थवर जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणानी परिसर दुमदूमला..

यावेळी शिवप्रेमी शंकर नाळे, सतीश मलमे, स्वप्निल जगताप, सचिन डोंगरे, स्वप्निल सावंत, सुरज भोसले, अविनाश शिंगाडे, अभिजित मोरे, रोहन मोरे, धीरज सावंत, जयदीप रजिगिरे, प्रणव पवार, रुद्र रजिगिरे, सारंग काळुगडे, राहुल शिंगाडे, रमेश दंगेकर, उदय पवार, तानाजी सावंत यांचेसह शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!