
निर्भीड पत्रकार – रोहित जाधव
जयसिंगपूर : शहराच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना केवळ कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नव्हे, तर एक माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी जयसिंगपूरकरांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
खाकी वर्दीतील कठोरतेसोबतच हाके साहेबांच्या स्वभावातील माणुसकी, संवेदनशीलता आणि जनतेप्रती असलेली आपुलकी यामुळे ते खऱ्या अर्थाने “देवमाणूस” ठरले आहेत.शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांवर त्यांनी काटेकोर नियंत्रण ठेवत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. कोणतीही तक्रार असो किंवा अडचण, सामान्य नागरिकांनी पोलिस ठाण्याचे दार ठोठावल्यावर हाके साहेबांनी ती मनापासून ऐकून तत्काळ न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला आहे.विशेष म्हणजे, सामाजिक भान जपत त्यांनी अनेक वेळा गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत, हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवणे,
तसेच तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांची प्रतिमा एक संवेदनशील अधिकारी म्हणून निर्माण झाली आहे.जयसिंगपूर शहराला सत्यवान हाके साहेबांसारखा अधिकारी लाभणे ही मोठी भाग्याची गोष्ट असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि माणुसकीपूर्ण वागणुकीमुळे “असे अधिकारी पुन्हा होणे नाही” अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटताना दिसत आहे.खाकी वर्दीतील कर्तव्य आणि मानवतेचा सुंदर संगम असलेले सत्यवान हाके साहेब हे जयसिंगपूरकरांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहतील, यात शंका नाही.
