निर्भीड पत्रकार – रोहित जाधव
शिरोळ तालुक्यातील विविध रेशन धान्य दुकानांमध्ये अनियमितता, काळाबाजार व अपारदर्शक वितरणाबाबत तक्रारी वारंवार समोर येत आहेत. गरीब व गरजू नागरिकांचे हक्काचे धान्य काही ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांना देण्यात येत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत,
त्यामुळे खालील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात,यामध्ये
1. सर्व रेशन धान्य दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत जेणेकरून वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहील.
2. काळाबाजार रोखण्यासाठी कठोर निरीक्षण ठेवावे.
3. प्रत्येक तीन महिन्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून दुकानांची तपासणी करण्यात यावी व अहवाल तयार करून सार्वजनिक करावा.
4. दोषी ठरणाऱ्या रेशन दुकानांवर कडक कारवाई करण्यात यावी.

वरील मागण्या त्वरित अंमलात आणण्यात याव्यात, अन्यथा दलित सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला,
सदर निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण मॅडम,शिरोळ तहसीलदार यांना देण्यात आले,
यावेळी दलित सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिंगाई, दलित सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आयुब पट्टेकरी, कुरुंदवाड शहराध्यक्ष तसेच शिरोळ तालुका अध्यक्ष किरण जगताप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
