माणगाव फाटा येथे झालेल्या अपघातात एक ठार.

निर्भीड पत्रकार: रोहित जाधव

माणगाव फाटा येथे हॉटेल सुकुन समोर झालेल्या अपघातात एक ठार. घटना स्थळा वरुन मिळालेली माहिती अशी की माणगाव ता. हातकणंगले येथील एका खासगी ॲक्युप्रेशर केंद्रा मधून उपचार घेऊन वसंतराव भाऊसाहेब हुगे ( वय 75 ) गणेश नगर शिरोळ हे आपल्या पत्नी सह घरी निघाले होते होते. दरम्यान माणगाव फाटा येथे आल्या नंतर रस्ता पास करत असताना हुगे यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. याचं वेळी कोल्हापूरहून इंचलकरंजी कडे जाणारी खासगी बस क्र. MH 09 FL 0456 याने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

घटनास्थळी तात्काळ सरपंच डॉ. राजु मगदूम , उपसरपंच पती उमेश जोग यांनी धाव घेत रुग्ण वाहिकेला पाचारण करत तात्काळ मदत कार्य सुरु केले. माणगाव येथील उपसरपंच पती उमेश जोग , ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पाटिल यांनी जखमीला तात्काळ इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालय दाखल केले मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या वेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती अपघाताची नोद हातकणंगले पोलीस स्टेशनला झाली आहे

कोल्हापूर – इचलकरंजी मार्गावरील माणगाव फाटा येथे वारंवार अपघात होत आहेत हे निदर्शनास येतात सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपर्क साधतं या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!