जैनापुर सरपंच पदी सौ. संगीता कांबळे यांचीच पुन्हा निवड…संविधानाचा सन्मान झाला,मला न्याय मिळाला – सरपंच सौ.कांबळे

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव

जैनापुरच्या सरपंच सौ. संगीता कांबळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काल शुक्रवार 27 जून रोजी सरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती .कोरम अभावी सभा तहकुब करून दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवारी दोन वाजता निवडीसाठी तहकूब सभा घेण्यात आली .एकूण सहा सदस्या पैकी आजही सरपंच उमेदवार सौ . संगीता रमेश कांबळे या एकमेव उपस्थित राहिल्या . निवडणूक निर्णय अधिकारी तथा जयसिंगपूर मंडळ अधिकारी राहुल कोळी यांनी अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी सौ . संगीता कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने आणि आजच्या सभेला कोरमची आवश्यकता नसल्याने सौ . संगीता कांबळे यांची सरपंच पदासाठी निवड झाल्याची घोषणा केली .यावेळी तलाठी अपर्णा तळेकर , ग्रामपंचायत अधिकारी धनाजी शिंदे हे उपस्थित होते .

निवडीनंतर मंडळ अधिकारी ,तलाठी, ग्राम पंचायत अधिकारी यांनी संगीता कांबळे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या .तर सरपंच कांबळे समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला .

दरम्यान निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सौ.संगीता कांबळे म्हणाल्या माझ्यावर विनाकारण राजकीय द्वेषातून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आणि मला सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले .पण आज पुन्हा दीड महिन्यांनी माझी सरपंच पदी निवड झाली .हा संविधानाचा सन्मान आहे मला न्याय मिळाला उर्वरित सरपंच पदाच्या काळात गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास कामे करणार आहे .

यावेळी योगेश कांबळे योगीराज कोळी आनंदा कोळी राहुल पाटील अनिल पाटील निकेत कांबळे आदींसह समर्थक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!