निर्भीड पत्रकार – रोहित जाधव
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व राज्य अध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी तसेच शेतीवर उपजीविका करणारे शेतकऱ्यांच्या जमिनी या बाधित होऊन हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यामुळे ते शेतकरी शेतीपासून वंचित राहणार आहेत तसेच ते भूमीहीन होणार आहेत. या शासनाच्या अन्यायकारक शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी उध्वस्त होऊन तत्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित गरीब शेतकरी लोकांच्या जीवन मरणाच्या लढाईत वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कृषी दिनाच्या दिवशी दिनांक 1 जुलै 2025 रोजी महामार्ग रस्ता रोको आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन पाठिंबा देणार आहे. सदर आंदोलनात सर्व पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने कोल्हापूर उत्तर चे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम व कोल्हापूर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी केले आहे.
