महात्मा गांधी ग्रंथालय,सांगली हायस्कूलचा ‘हेरिटेज वॉक’…संयोग ट्रस्ट तर्फे देदीप्यमान स्थळांची ओळख.

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव

सांगली : वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना असलेली सांगली हायस्कूलची इमारत, वाचनसंस्कृतीची जपणूक करणारे महात्मा गांधी ग्रंथालय सांगलीच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. संयोग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हेरिटेज वॉक उपक्रमात दीडशे वर्षांपूर्वीच्या सांगली हायस्कूलसह १०९ वर्षांचे महात्मा गांधी ग्रंथालय या दोन्ही संस्थांबद्दल माहिती देण्यात आली.

सांगलीच्या देदीप्यमान इतिहासाची ओळख करून देण्याच्या उपक्रमाबद्दल ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांनी सांगली हायस्कूल, महात्मा गांधी ग्रंथालयाच्या इतिहासाची माहिती दिली. वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी सांगितले की, सांगली हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम हे ब्रिटिशकालीन व्हिक्टोरियन शैलीतील आहे. ते करताना भारतीय वातावरणाचा बारकाईने विचार केला गेला आहे. इमारतीची प्रत्येक भिंत, कमान, खिडकी आणि प्रत्येक खोली अभ्यासपूर्वक तयार करण्यात आली आहे.

ट्रस्टचे प्रमुख सदानंद गाडगीळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सांगलीतील विविध ऐतिहासिक वास्तूंची माहिती या उपक्रमातून देण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.सांगली हायस्कूल शाला समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील-मजलेकर, वास्तुविशारद स्मिता कुलकर्णी, उद्योजक संदीप सोले, मुख्याध्यापक संजय बिरनाळे, नवले, महात्मा गांधी ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक मेहता, उपाध्यक्ष डॉ. लता देशपांडे, अमिता शहा, विलास शहा, शरद शहा, दिगंबर सूर्यवंशी, निखिल दामाणी, डॉ. दत्तात्रय पाटील, कल्पेश जाजल, संजय देव, सुहास पोतदार, डॉ. उदगावकर, वामन बर्वे, शेखर जाधव, जया जोशी, मनीषा माने, अशोक कुलकर्णी, प्रफुल्ल उपाध्ये, दिनेश कुलकर्णी, गजानन पटवर्धन, शशिकांत कुलकर्णी, शरद शहा, बिना पाटील, प्रियांका दामाणी, लक्ष्मण जाधव, आनंदराव जाधव, मिलिंद लिमये यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!