निर्भीड पत्रकार; रोहित जाधव
मिरजेतील चर्च रोड जवळील आज एका सलून दुकानात दोन गटात जोरदार हाणामारी झाली.
हा वाद पूर्व वैमण्यसातून झालेचे समजते.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणेश तानाजी कलकुडगी रा.वडर गल्ली मिरज याने मागील झालेला वाद डोक्यात धरून रोहित संजय कळकुटगी रा. वडर गल्ली मिरज याच्यावर गोळीबार केला.पिस्तूलाच्या साहाय्याने एक फायर राउंड उडवल्याने जोरात आवाज झाला. सुदैवाने काही अकस्मित घडले नाही. दोघेही राहणार वडर गल्ली येथील आहेत. ही घटना मिरज शहर पोलीस ठाणेच्या हद्दीत घडली. घटना झाल्यावर लगेचच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या माध्यमातून पोलीसांचा “ताफा” घटना स्थळी दाखल झाला होता

यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सामंतगुन्हे प्रकटी करण शाखेचे सहाय्यक अण्णासाहेब गादेकर यांनी माहिती घेतली असता घटनेची अद्याप विस्तृत माहिती मिळालेली नाही.पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे व पोलीस उपविभागीय अधिकारी प्राणिल गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
