निर्भीड पत्रकार: रोहित जाधव
श्री अंबाबाई तालीम संस्थेचे कै. म. द. करमरकर माध्यमिक विद्यालयामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ काळे मॅडम यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत केले. या प्रवेशोत्सवप्रसंगी विद्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती तसेच विविध रंगाचे फुगे लावून विद्यार्थी स्वागतासाठी सुशोभीकरण करण्यात आले होते.
नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये गोड शिरा व मसालेभात देण्यात आला. अशाप्रकारे अत्यंत उत्साही वातावरणात शाळा प्रवेशोत्सव संपन्न झाला.
