शिरोळ येथील तरुणाचा जुन्या वैमनस्यातून निर्घृण हत्या – एक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव

शहापूर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रमेश पाटील (वय 21, रा. मोजे आगार, ता. शिरोळ) या तरुणाचा 13 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क, सरस्वती शहापूर येथे खून करण्यात आला. या प्रकरणी नामदेव गणपत चव्हाण (रा. चव्हाणवाडी, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचे भाऊ व आरोपी अभिषेक सुभाष मस्के (रा. मोजे आगार, ता. शिरोळ) हे एकमेकांचे जुने मित्र असून, त्यांच्यात दोन वर्षांपूर्वी भांडण होऊन घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते. त्या जुन्या भांडणाच्या रागातूनच आरोपीने गणेश पाटील याच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर व मानेला वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!