खोची येथे क्रिकेटच्या मैदानात हिंदकेसरी हरण्या बैलांची बाजी.

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव

खोची येथे झालेल्या भव्य आणि दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये हातकलंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील युवा मंच यांच्या वतीने APL क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये महादेव पाटील यांच्या नेतृत्वात असणाऱ्या भैरवनाथ स्पोर्ट्स या संघाचा प्रथम क्रमांक आला .विराज स्पोर्ट्स या संघाचा द्वितीय क्रमांक आला .ए पी वॉरियर्स या संघाचा तृतीय क्रमांक आला. क्रिकेट स्पर्धेमध्ये गावातील दहा संघाने सहभाग घेतला होता यामध्ये प्रत्येकी संघामध्ये 11 खेळाडूचा सहभाग होता.

विराज स्पोर्ट्स आणि भैरवनाथ स्पोर्ट्स यामध्ये अंतिम सामना चुरशीचा झाला. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने तसेच माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची उपस्थिती होती .या स्पर्धेचे खास आकर्षण सप्तकेसरी शर्यत क्षेत्रात नामवंत नाव असणारे “हरण्या” या बैलाची उपस्थिती आकर्षण होते.

दोन्हीही प्रमुख पाहुण्यांना हरण्या सोबत फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही.यावेळी खोची आणि पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट रसिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव, अभिषेक बनगे, भेंडवडे गावचे सर्जेराव माने, काकासो चव्हाण, हर्षवर्धन चव्हाण, संतोष माळी, प्रमोद सूर्यवंशी सरकार, जगदीश पाटील,अमोल पाटील, रमेश जाधव ,पतंगराव वाघ, निखिल बामणे, संभाजी नांगरे पाटील, राज पाटील, सोनाजी वाघ, अश्विनराव वाघ, अजय पाटील युवा मंच सर्व पदाधिकारी सदस्य सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!