मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समिती जयसिंगपूर शहर यांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव

मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समिती जयसिंगपूर शहर यांच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुणवंत 10 वी 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये, पदवी प्राप्त केलेले , तसेच युवा उद्योजक अशा वडार रत्न यांचा सत्कार, मी वडार महाराष्ट्राच्या विद्यार्थी गौरव समितीच्या माध्यमातून करण्यात आला, स्वागत कार्यक्रमाचे आयोजक व मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समितीचे अध्यक्ष श्री सचिन मनोहर भोसले यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक व समाज बांधवांचे कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे स्वागत केले, तसेच प्रस्तावनामध्ये त्यांनी असे मत व्यक्त केले की गेली 12 वर्ष झाले मी ,मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समितीच्या जयसिंगपूर शहर च्या माध्यमातून 10 वी 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच वडार रत्न अशा मान्यवरांचे सत्कार सोहळा करीत आहे,गेली दोन वर्षापासून 17 अनाथ मुलं व मुली यांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेतले आहे या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम सर्वांच्या मदतीने आपण हाती घेतलेला आहे ,

हा कार्यक्रम इतर विद्यार्थी व समाज बांधवांना प्रेरणा देण्यासाठी राबवत आहे तसेच इथून पुढे कोणत्याही विद्यार्थ्यास शैक्षणिक क्षेत्रामध्ये आर्थिक मदत लागल्यास ते आपण समाजातील कर्तुत्वान लोकांच्या मदतीने आपणास मदत करू अशी गव्हाही दिले आहे, या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना व वडार रत्न यांना मी वडार महाराष्ट्राचा संघटना चे संस्थापक अध्यक्ष श्री विजयराव चौगुले साहेब , श्री ममित चौगुले साहेब, श्री तानाजी पोवार (माजी उपनगराध्यक्ष इचलकरंजी)साहेब, श्री सुधीर पोवार संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य मी वडार महाराष्ट्राचा संघटना यांच्या शुभेच्छा सांगण्यात आले तसेच मनोगतम मध्ये मी वडार महाराष्ट्राचा संघटना चे जिल्हाध्यक्ष श्री अर्जुन देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या

तसेच जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री सत्यवान हाके साहेब या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांच्या हातून व वडार समाजातील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे व वडार रत्न यांचा सत्कार करण्यात आले व श्री सत्यवान हाके साहेब यांनीही विद्यार्थी, पालक व मान्यवर यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या श्री महेश कलकुटगी , श्री गुंडाप्पा पवार ,यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,

तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे व समाज बांधवांचे आभार श्री मारुती चौगुले यांनी मांनले आहे,या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर , श्री सुरेश शिंगाडे तालुकाध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा संघटना , उद्योजक संतोष भोसले, विनायक शिंगाडे पीडब्ल्यूडी अधिकारी,प्रदीप भोसले, अनुज भोसले , परशुराम शिंगाडे, नितीन साळुंखे , नितीन भोसले,राम शिंगाडे ,सचिन गाडीवर , अनिल माने ,अंकुश पवार, अमोल वडर, लखन नलवडे, गंधर्व भोसले, प्रमोद पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!