प्रतिनिधि – विजय पाटील.
जयसिंगपूर मध्ये हार्डवेअर दुकानांच्या कडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणुक होत आहे. जयसिंगपूर मध्ये सध्या विकत असलेल्या मोळे ,तार ,नटबोल्ट तसेच कामगार वर्गासाठी लागणारे इतर साहित्यांच्या विक्री मागे लोकांची मोठी फसवणूक करून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची वसुली केली जाते.
जयसिंगपूर मध्ये असलेल्या हार्डवेअर दुकानांमध्ये एकीकडे दुकानांमध्ये साहित्यांची किंमत वेगळी तर दुसरीकडे असलेल्या हार्डवेअर दुकान मध्ये साहित्याची वेगळी किंमत केली जात आहे. जयसिंगपूर मधील हार्डवेअर दुकानांमध्ये विक्री साहित्यांची किंमत ही मनमर्जी लावली जाते. जयसिंगपूर मधील हार्डवेअर दुकान मध्ये वस्तूंची किंमत 10 रुपये प्रमाणे विक्री केली जाते, तर दुसऱ्या हार्डवेअर दुकानांमध्ये तीच वस्तू 40 रुपये प्रमाणे विक्री केली जाते. प्रत्येक दुकानदार मनाने किंमत लावत असेल तर यावर कोणाचे अंकुश आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.
यासाठी जयसिंगपूर मध्ये कोणते असोसिएशन नेमले आहे का.…? जयसिंगपूर मधील होणाऱ्या लोकांची फसवणूक कधी थांबणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या उपस्थित केला जात आहे? यासाठी कोणत्या युनियनची स्थापना केली आहे का? जेणेकरून लोकांची होणारी फसवणूक थांबली जाईल…. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार का? याकडे जयसिंगपूरकरांचे लक्ष वेधून राहिले आहे…
