निर्भिड पत्रकार – रोहित जाधव.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात बेळंकी येथे साजरी करण्यात आली, छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष श्री विलास देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाप्रमुख तानाजी भोसले, सरचिटणीस संतोष माने, सां.मि.कु महापालिका क्षेत्र प्रमुख श्री विजय धुमाळ यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले,
कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाप्रमुख पूर्व विभाग श्री प्रदीप कोडग व त्यांचे सहकारी यांनी केले, यावेळी बेळंकी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावातील मध्यवर्ती चौकात भगवा रक्षक तरूण मंडळ, जय भवानी मंडळ या फलकाचे अनावरण श्री विलास देसाई यांच्या हस्ते करून जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या फलकाला देखील पुष्पहार अर्पण यावेळी करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासून बेळंकी गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते पण यावेळी चे वैशिष्ट्य म्हणजे डॉल्बी मुक्त जयंती साजरी करण्याचा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी घेतला
त्याऐवजी उद्या दिनांक 15 मे 2024 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर इतिहासकार श्री प्रथमेश इंदुरकर यांचे व्याख्यान सायंकाळी सात वाजता आयोजित केले आहे, याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे,

ग्रामस्थांकडून यावेळी आलेल्या पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन अच्युत रणदिवे, यांनी केले यावेळी छत्रपती संभाजी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप कोडग, उपाध्यक्ष सौरभ रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच, सोसायटी संचालक,पद्मनाभ जाधवराव सरकार(बाबूजी), संताजी गायकवाड, संजय पवार, श्रीधर गायकवाड, मोहन गायकवाड, अजित कोडग, अतुल शिंदे,अजी माजी सैनिक संघटना,संभाजी गायकवाड, नेताजी गायकवाड, दिगंबर जाधव, सूरज माने, दयानंद हत्ते, भिमराव गायकवाड, नेताजी गडदरे, सकल मराठा समाज व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
