निर्भिड पत्रकार – रोहित जाधव
संतप्त जमावाने पिकअप मिनी टेम्पो फोडली,घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस दाखल.
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावाजवळ तीन वाहनांच्या विचित्र आणि भीषण अपघातात एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,
सदरचा अपघात आज दिनांक 20 मे 2024 रोजी 11 वाजता झाला असून याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर च्या दिशेकडून मिरज कडे ट्रॅक्टर क्र एम एच 10 डी व्ही 689 ला ओव्हरटेक करणारी पॅगो मालवाहतूक रिक्षात पाच लहान मुले आणि पति पत्नी हे वीटभट्टी वर काम करणारे मजूर बसले होते
सदरची पॅगो मालवाहतूक रिक्षा ओव्हरटेक करताना मागून आलेल्या पिकअप मिनी टेम्पो एम एच 11 बी एल 6165 ने धडक दिली तर पॅगो रिक्षा ट्रॅक्टर च्या ट्रॉलीला धडकली तर पॅगो रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार वय वर्ष 10 रा. गोपाळ वस्ती सातारा हा रस्त्यावर पडला तर त्याच्या अंगावरून पिकअप मिनी टेम्पो गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सदर अपघात झाल्यानंतर प्रचंड जमाव जमला चिमुकल्याचा या अपघातात जीव गेल्याने मात्र संतप्त जमावाने मिनी टेम्पोच्या काचा फोडल्या
याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.
