जयसिंगपूर येथील 11 वी गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक वतीने शिवजयंती निमित्ताने शिवमुर्तीचे पूजन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.सत्यवानजी हाके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, युवा उद्योजक भरतजी माणगावे यांच्या शुभहस्ते तर सायंकाळी वीर योद्धा मर्दानी आखाडा, उमळवाड यांचे शिवकालीन शस्त्र, लाठी – काठी याचे प्रात्यक्षिकचे शुभारंभ पोलीस उपधिक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी बाल शिवव्याख्याते चि. हर्षवर्धन धनगर यांचे शिवाचारित्रवर व्याख्यान झाले.या कार्यक्रमास क्रांती फौंडेशनचे निर्मलजी पोरवाल, कुमारजी नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी धनवडे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष भगवंत जांभळे, प्रताप दाईंगडे, अनुप दाईंगडे, प्रथमेश जाखले, आदित्य दाईंगडे, वेदांत पोतदार, महेश माने, आनंदसिंग रजपूत, इंदर जाठ शिरोळ – वाडी – कुरुंदवाड वडाप युनियनचे चालक -मालक आदिंच्या प्रमुख उपस्थित होते.
