मालू हायस्कूलमध्ये मतदार आणि पोलिसांच्यात वादावादी.

बोगस मतदाना विरोधात तक्रार देण्यासाठी आले होते महिला मतदारांच्या सहित विज्ञान माने.

मिरज: बोगस मतदाना विरोधात तक्रार द्यायला आलेल्या विज्ञान माने यांना विश्रामबाग पोलीसानी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला मतदार आणि पोलीस यांच्यात जोरदार वादावादी झाली.मिरज येथील मतदान केंद्रावर महिला मतदान करण्यासाठी आल्या होत्या, मात्र त्यांच्या नावावर अगोदरच अन्य महिला मतदान करून गेल्या होत्या. या बोगस मतदाना विषयी महिलांनी तक्रार केली.

सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने यांना बोलवून घेतलं. विज्ञान माने आणि महिला मतदार यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना झालेल्या प्रकार सांगितला. मात्र विज्ञान माने यांच्या सांगण्यानुसार त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही, उलट विज्ञान माने यांनाच पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त झालेल्या महिला मतदार आनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी जोरदार वाद झाला.

संतप्त महिलांच्या आक्रमकतेमुळे पोलिसांनी विज्ञान माने यांना ताब्यात घेतलं नाही. बोगस मतदाना बाबत चौकशी करून सदर व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!