हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 68 टक्क्यांहून अधिक मतदान-निवडणूक अधिकारी संजय शिंदे.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव

कोल्हापूर ता.७:अंत्यंत अटीतटीची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 68 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.याबाबत निवडणूक अधिकारी डॉ.संजय शिंदे यांनी सांगितले की हातकणंगले लोकसभा मतदार संघात आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६८.६५ टक्के मतदान झाले मात्र अंतिम आकडेवारी रात्री उशिरा सर्व मतदान केंद्रांचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.


कोल्हापूर लोकसभा मतदार संघात आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६८.३९ टक्के मतदान झाले.
आज संध्याकाळी प्राप्त झालेली मतदानाची तालुक्या नुसार प्राप्त झालेली मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघ
हातकणंगले-७०.००
इचलकरंजी ६६.०५
इस्लामपूर ६७.२०
शाहूवाडी ७०.९६
शिराळा ६५.९६
शिरोळ ६८.००
कोल्हापूर लोकसभा मतदार संघ
चंदगड ६८.१८
कागल ७३.८०
करवीर ७८.८९
कोल्हापूर उत्तर ६४.५४
कोल्हापूर दक्षिण ६८.८०
राधानगरी ६६.६८.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!