भारतीय सैन्य दलाचे हेलिकॉप्टरचं एरंडोली मध्ये इमर्जन्सी लँडिंग.

भारतीय सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं मिरज तालुक्यातील एरंडोली गावांमधील एका शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. इमर्जन्सी लँडिंग च्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सैन्य दलाचे हेलिकॉप्टर शेतात अचानकपणे उतरवल्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली. या हेलिकॉप्टरमधील सैनिक सुखरूप आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!