
निर्भिड पत्रकार – रोहित जाधव
श्री शिव चिदंबर महास्वामी यांच्या कृपाशीर्वादाने,व परमपूज्य गुरुवर्य उमाकांत भाऊ कुलकर्णी यांच्या कृपाशीर्वादाने,गुरुगोविंद लांबे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली/ आशीर्वादाने
श्री शिव चिदंबर महास्वामी देवस्थान श्री तीर्थ क्षेत्र कवठेमहांकाळ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा दिनांक 10 ते 12 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील सर्व चिदंबर भक्तांना भाविकांना कळविण्यात येते की रुद्र स्वाहा कार यज्ञाचे आयोजन दिनांक 10 ते 12 मे रोजी या कालावधीत आयोजित केले असून पूर्णाहुती रविवार दिनांक 12 मे रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केला आहे.

कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेषा पुढील प्रमाणे
पहाटे पाच ते सहा काकड आरती व भजन,सायंकाळी सहा ते सात हरिपाठ,सात ते नऊ संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था कोळे यांचे हरिकीर्तन व महाप्रसाद.
दिनांक 10 मे रोजी सायंकाळी सहा ते आठ ह.भ.प झी टॉकीज फेम कीर्तनकार अनिल महाराज तडवळेकर यांचे,तर दिनांक 11 मे रोजी सायंकाळी ह.भ.प झी टॉकीज फेम युवा कीर्तनकार हणमंत महाराज आटपाडकर यांचे तर दिनांक 12 मे रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह.भ.प भागवताचार्य प्रेमानंद महाराज शास्त्री (अण्णा) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी रथ,वारकरी,उंट,घोडे,बँड ढोल,पथक,लाईट यांच्या खास आकर्षणामध्ये श्री शिव चिदंबर महास्वामींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, तरी या शिव चिदंबर महास्वामी मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिना निमित्त आयोजित सोहळ्याला उपस्थित राहून स्वामींचे कृपा आशीर्वाद घ्यावेत असे नम्र आवाहन चिदंबर सेवा समिती कवठेमंकाळचे गुरुवर्य चिदंबरदास श्री गुरु गोविंद लांबे महाराज यांनी पंचक्रोशीतील सर्व चिदंबर भाविकांना केले आहे.तरी या सोहळ्यास उपस्थित राहून कृपा आशीर्वाद घ्यावेत ही नम्र विनंती.
कार्यक्रमाचे ठिकाण
श्री शिव चिदंबर महास्वामी देवस्थान श्री तीर्थक्षेत्र कवठेमंकाळ जिल्हा सांगली
आपले नम्र
चिदंबर सेवा समिती कवठेमहांकाळ, पिंपरी अवघड,मिरज,जत,तासगाव, सांगोला,अकलूज,माळशिरस मंगळवेढा,खानापूर, बारामती
संपर्क -9975161716
