
निर्भीड पत्रकार – रोहित जाधव
सध्याची निवडणूक पाहता आत्ताचे खासदार संजय काका पाटील हे गेल्या दहा वर्षांमध्ये जनतेमध्ये दिसून आलेले नाहीत.अशी जनतेतून चर्चा आहे 2019 मध्ये स्वाभिमानी चिन्हावर लढलेले विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेले चंद्रावर पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून ते नागरिकांच्या चर्चेतून कमी झालेले आहेत.बॅक फुटला गेलेले आहेत.
सध्या सांगली जिल्ह्यातील परिस्थिती पाहता अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे चर्चेत येत आहेत. कारण मागच्या इलेक्शनच्या वेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारामुळे मताचे विभाजन झालं होतं.पण आता विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिल्यामुळे.त्यांच्या मतामध्ये वाढ होणार हे दिसुन येत आहे.
विशाल पाटील यांचा मार्ग वंचित मुळे मोकळा झालेला दिसून येत आहे. तरी वृत्तवेग न्यूज चॅनलने नागरिकांच्या घेतलेल्या सर्वेनुसार जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाच पसंती मिळत आहे. विशाल पाटीलच जिल्ह्याचे खासदार म्हणून दिसून येतील अशी जनतेतून चर्चा होत आहे.
