मतदान करा व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव

जगात सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशात आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अठरा वर्ष पुर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री पुरूषाला मतदानाचा हक्क आणि अधिकार देऊन प्रत्येकालाच लोकशाहीचा पाईक होण्याचा मान दिला आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला फार मोठा मताचा अधिकार बहाल केला आहे.‌ तो अधिकार फक्त योग्य उमेदवाराला आपले मत देऊन पार पाडा.

पण आज अनेक जण माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे म्हणून मतदानाकडे पाठ फिरवितांना दिसत आहे. पण लक्षात ठेवा मतदान न करणे हा सुद्धा एक अपराधच आहे. कारण अशा आपल्या प्रवृत्ती मुळे चुकीची व्यक्ती निवडून जाण्याची शक्यता खुप जास्त असते. तुमच्या एका मतांची किंमत लाख मोलाची आहे. तुमच्या एका मतांमुळे एकाद्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागतो. तर तुमच्या एका मतांमुळे एखादा उमेदवार विजयी होऊ शकतो. तर चला मतदानासाठी आपला वेळ काढा आणि आपली जबाबदारी पार पाडा.

तुमचे अमुल्य मतच करेल देशाची लोकशाही बळकट तेव्हा मतदार राजा आतातरी जागा हो.. आणि लोकशाहीचा धागा हो.. अरे तुझ्या अमुल्य मताचे दान हीच आहे लोकशाहिची खरी शान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!