
निर्भिड पत्रकार – रोहित जाधव
दानोळी ता शिरोळ येथे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी व मतदारांना जागृत करण्यासाठी तसेच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हावे यासाठी दानोळी तसेच आसपासच्या गावात भारतीय जनता पार्टी च्या कार्यकत्यांनी अब कि बार 400 पार वातावरण टाईट करून टाकले आहे
यावेळी दानोळी गावात उपस्थित महायुतीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणेश जगताप तसेच रसायन व खत मंत्रालय भारत सरकार संचालक व भाजप पंचायत राज व ग्रामविकास विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये प्रचार रॅली व मतदारांना जागृत करण्यासाठी प्रचार दौरा संपन्न झाला

यावेळी या प्रचार दौऱ्यासाठी उपस्थित मान्यवर संजय माने पंचायत राज व ग्रामविकास सहसंयोजक, तसेच डॉ.अण्णासाहेब पाटील भाजपा जैन प्रकोष्ठ कोल्हापूर पुर्व जिल्हाध्यक्ष व पदमाकर कांबळे भाजप पंचायतराज व ग्रामविकास मागासवर्गीय विभाग कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, तसेच महादेव गावडे भाजप ग्राम संयोजक,सुदर्शन मगदूम भाजप जिल्हा सरचिटणीस जैन प्रकोष्ठ तसेच दादा पाटील,श्रीकांत पोवार तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व गावातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
