किमान हमीभाव कायदा करण्यासाठी संसदेत पाठवा : राजू शेट्टी.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव

दोन वेळा खासदार म्हणून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत असताना ऊसाला एफ आर पी मिळावी आणि भूमी अधिग्रहण कायदा करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला देशातील केवळ 6 टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो मात्र 94% शेतकऱ्यांनी पिकवलेल्या 24 विविध पिकांना आधारभूत किंमत मिळावी याकरिता हमीभाव कायदा संसदेत पारित करण्यासाठी पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून द्यावे असे आवाहन स्वाभिमानीचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील प्रचार सभेत केले

येथील भाजी मंडई येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा झाली यावेळी ते बोलत होते वीरपत्नी श्रीमती सुमन प्रकाश चव्हाण या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या माजी नगरसेवक प्रदीप चव्हाण यांनी स्वागत केले या सभेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेने पाठबळ दिले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढली शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा यासाठी लाट्या काट्या खाल्ल्या यामुळे गेली 22 वर्ष सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी खंबीरपणे सोबत उभी राहिली आहे,एक वेळा जिल्हा परिषद सदस्य एक वेळा आमदार दोन वेळा खासदार होण्याची संधी जनतेने दिली मिळालेल्या संधीचे सोने करीत असताना सण 2009 साली शेतकरी विरोधी आलेल्या कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला एफ आर पी मिळावी असा कायदा करण्यासाठी आंदोलन करून तो कायदा संसदेत मंजूर करून घेतला

तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करत असताना त्यांना योग्य मोबदला मिळावा याकरिता भूमी अधिग्रहण कायदा मंजूर करून घेतला त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकाला आधारभूत किंमत मिळावी शेतकऱ्यांच्या घामाची चोरी होऊ नये याकरिता शेतीमालाच्या किमती ठरवण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत त्यासाठी किमान हमीभाव कायदा मंजूर होण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे याचा फायदा देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे आणि तो कायदा पारित करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून संसदेत जाणे आवश्यक आहे यासाठीच ही निवडणूक लढवीत आहे शेतकरी सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवत असताना विश्वासाचे नाते निर्माण केले आहे यामुळे गेल्या 22 वर्षातल्या सर्व निवडणुकीला जनतेने खंबीर साथ दिली एक वोट एक नोट या पद्धतीने निवडणुकीच्या खर्चासाठी आर्थिक देणगी दिली यावेळी ही या निवडणुकीत शेतकरी मतदार देणगी देऊन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन देत असल्याने या निवडणुकीत विजय निश्चित आहे तात्कालीन महाविकास आघाडी आणि सध्याचे भाजप सरकार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहेत

शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्याकरिता ही निवडणूक स्वाभिमानीच्या अस्तित्वाची निवडणूक आहे शक्तिपीठ महामार्गातील जमीन भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याकरिता संसदेत आवाज उठवणे गरजेचे आहे शिरोळ तालुक्याने प्रत्येक निवडणुकीत मताची आघाडी दिली आहे यावेळी मताधिक्याची परंपरा कायम राखली जाईल असा माझा विश्वास आहे सर्व मतदार बंधू-भगिनींनी शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील म्हणाले की शिरोळ तालुक्यातील जनतेने शेतकऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा त्यांच्या घामाला दान देणारा भूमीपुत्र राजू शेट्टी यांच्या रूपाने दिला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा संघर्ष योद्धा म्हणून राजू शेट्टी यांची देशात ओळख निर्माण झाली आहे हे शिरोळवासीयांना अभिमानास्पद आहे आपण राजू शेट्टीना मतं देतो यासारखे दुसरे भाग्य नाही शेतकरी कष्टकरी सन्मानाने जगला पाहिजे त्याचा स्वाभिमान टिकला पाहिजे यासाठी राजू शेट्टी यांनी रक्त सांडले आहे शेतकरी जे पिक पिकवतात त्याला उत्पादन खर्चावर आधारभूत दर मिळावा ही भूमिका घेऊन राजू शेट्टींनी आंदोलन केली यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे पुन्हा एकदा शेतकरी चळवळीला बळ येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी राजू शेट्टीना साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मादनाईक बोलताना म्हणाले की राजू शेट्टी यांना पाठिंबा देतो असे सांगून महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी राजकारण करून फसवले तुम्ही कामाला लागा तुमचं ठरलेलं आहे असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला राजू शेट्टी प्रचार करीत असतानाच आमच्या चिन्हावर लढा असा निरोप पाठवला पण शेतकरी चळवळ मोडीत निघेल यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवण्याचा निर्णय राजू शेट्टी यांनी घेतला आणि प्रचारास सुरुवात केली त्याचवेळी महाविकास आघाडीने उमेदवार घोषित करूनं प्रचाराला सुरुवात केली राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना उसाला चारशे रुपये मिळणारा दर 3100 वर आणून ठेवला यावर्षी मागील गाळपासाठी आलेल्या उसाला 100 आणि या यावर्षी गाळप होणाऱ्या उसाला 100 रुपये साखर कारखानदारांकडून घेणाचा तोडगा काढला मागील 100 रुपये घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील जनतेने राजू शेट्टींना मताच्या रूपाने पाठबळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले

शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे बोलताना म्हणाले की शिरोळमध्ये एक काळ असा होता खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य गोकुळ दूध संघाचे चेअरमन अशा विविध पदांवर शिरोळचे सुपुत्र होते यावेळी गावातील एकीची चर्चा राज्यात होत होती या एकीला कुणाचे दृष्ट लागली याचे उत्तर शोधण्याची गरज आहे आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देत असताना राजू शेट्टीनी देशात शेतकरी नेता अशी ओळख निर्माण केली यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांना पिकवलेल्या मालाला दर मिळत आहे राजू शेट्टी यांनी खासदारकीच्या माध्यमातून हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला खासदार धैर्यशील माने हे आठ हजार दोनशे कोटीची विकास कामे केल्याची टिमकी वाजवत आहे मात्र त्यातील साडेसात हजार कोटी रुपये हे केवळ रस्त्याच्या कामावर खर्च झाले आहे पण या रस्त्यालाही मंजुरी खासदार शेट्टींच्या काळात मिळाली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर हे निवडणूक लढवत आहेत त्यांनी आपल्याच तालुक्यातील धरणाला विरोध केला सध्याचे खासदार किती वेळा या मतदारसंघात आले याचा विचार करून या निवडणुकीत राजू शेट्टींना विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केलेस्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री पाटील राज्य सरचिटणीस सूर्यभान जाधव शिरोळ शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी , माजी उत्तम माळी , रावसाहेब पाटील – मलीकवाडे , आण्णासो चौगुले , अमरसिंह माने , अनिल चव्हाण , महेश देशमुख , मोहन पाटील , सतिश माने , अच्युत कुलकर्णी , प्रशांत गंगधर , दत्तात्रय माने , कॉ आप्पा पाटील , , धीरज शिंदे , यांच्यासह स्वाभिमानी पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!