
निर्भीड पत्रकार – रोहित जाधव
कोथळी (ता.शिरोळ) येथे दिलीप पाटील यांच्या प्लॉटजवळ जयसिंगपूर मार्गावर सुदर्शन महावीर चुडाप्पा (वय 46 रा.कोथळी ता.शिरोळ) येथे मोटरसायकलवरून जात असताना कुत्रे आडवे आल्याने अपघात झाला.
यात चुडाप्पा हे जखमी होवून त्यांचा मूत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी निष्काळजीपणे मोटरसायकल चालविल्याप्रकरणी मयत चुडाप्पा यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 23 मार्च रोजी घडली आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत सोमवारी झाली असून पो.ना.विजय पवार यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
