
निर्भिड पत्रकार – रोहित जाधव
जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नाम, जप, यज्ञ, याग श्री गुरूचरित्र पारायण सप्ताहाला सुरुवात झाली आहे. सोमवारी ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी अग्निदिपन करण्यात आला.
मंगळवारी मंडल स्थापना, स्थापित देवता हवन नित्यस्वाहाकार व गुरूचरित्र वाचन प्रारंभ होणार आहे. बुधवारी नित्यस्वाहाकार, गणेश याग, गुरूवारी नित्य स्वाहाकार, स्वामी याग, शुक्रवारी नित्य स्वाहाकार व चंडी याग, शनिवारी नित्य स्वाहाकार व गिताई याग, रविवारी नित्य स्वाहाकार, रूद्र याग, मल्हारी याग व सोमवारी नित्य स्वाहाकार बलि पुर्णाहुती श्री सत्यदत्त पुजन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी लाभ घेण्याचे अहवान करण्यात आले आहे.
