धरणगुत्तीत 5 लाखाचा ऐवज लंपास..चोरीची शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद.

निर्भिड पत्रकार – रोहित जाधव

धरणगुत्ती (ता शिरोळ) येथील पुनम अभिजीत पवार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील तिजोरीचे कुलूप तोडून 5 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत ही चोरीची घटना दिनांक 25 ते 28 एप्रिल 2024 दरम्यान घडली आहे या चोरीची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पुनम अभिजीत पवार यांचे धरणगुत्ती येथील गोसावी टेक येथील खंडोबा मंदिरासमोर राहते घर आहे पवार या काही कामानिमित्त आपल्या आईच्या घरी गेल्या होत्या यामुळे त्यांचे घर बंद होते दिनांक 25 ते 28 एप्रिल 2024 रोजीच्या मुदतीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील तिजोरीचे लॉक मोडून तिजोरीतील सुमारे 5 लाख रुपयाचे दागिने लंपास केले आहेत यामध्ये 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे गंठण 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे नक्षी असलेले तोडे 50 हजार रुपयाचे एक तोळा कानातील सोन्याचे टॉप्स 50 हजार रुपयाची एक तोळा सोन्याची चेन1 लाख रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याच्या बांगड्या असा एकूण 5 लाख रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे

यावेळी चोरट्याने आणखीन काही मिळते का हे पाहण्याकरिता घरातील आणि कपाटातील सर्व साहित्य विस्कटलेले होते या चोरीची फिर्याद पूनम अभिजीत पवार यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे

शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे घटनास्थळी ठसेतज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते श्वान घटनास्थळापासून काही अंतरापर्यंतच घुटमळत राहिले तर ठसे तज्ञांनी घराच्या दरवाजावरील तिजोरीवरील ठसे घेतले
या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!