जयसिंगपूर:आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वेदांती गाडेकरला गोल्ड मेडल

निर्भीड पत्रकार – रोहित जाधव

नेपाळ देशाची राजधानी असलेल्या काठमांडू येथे ९ व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भारताने घवघवीत मिळविले. यात सुळकुड (ता.कागल) येथील लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल या शाळेची विद्यार्थीनी वेदांति विजय गाडेकर (रा.गजबरवाडी ता.निपाणी) हिने गोल्ड मेडल मिळवून देशात कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

त्याचबरोबर प्राथमेश रावसाहेब कुंभार (रा.सुळकुड) -सिल्वर मेडल, अदिती दशरत निकम (रा.गजबरवाडी) -ब्रॉन्झ मेडल, स्नेहल अमोल निकम (रा.गजबरवाडी) – ब्रॉन्झ मेडल, प्रथमेश बसगोंडा पार्वते (रा.सुळकुड)-ब्रॉन्झ मेडल यांनी उंचाक्की यश मिळविले. या विद्यार्थ्यांनी ए. बी.स्पोर्ट्स यांच्यामार्फत कराटे स्पर्धेत सहभाग घेतला होता. याना आविनाश पाटील व प्रशिक्षित सुमित खोत यांचे मार्गदर्शन लाभले. या कराटे स्पर्धेसाठी जगातून चीन, भारत, श्रीलंका, भूतान, बांग्लादेश यासह अनेक देशातील सुमारे २ हजार खेळाडू आले होते.

यातून वेदांती गाडेकर हिने यश खेचून आणले आहे. दरम्यान कोल्हापूर येथे यशस्वी विद्यार्थी आल्यानंतर ए. बी.स्पोर्ट्स यांच्यामार्फत सत्कार करून जल्लोष करण्यात आला. त्यांनतर गजबरवाडी येथे आल्यानंतर ग्रामस्थांनी सत्कार करून स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!